पुणे, 17 डिसेंबर 2023: क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत अंतिम फेरीत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने बंगाल विझार्ड्स संघाचा 41-28 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने बंगाल विझार्ड्स संघाचा 41-28 असा पराभव केला. महिला एकेरीत बेंगळूरुच्या एरिना रोडीनोवाला बंगालच्या मारिया तिमोफिवाने 9-11 असे पराभूत केले. पण पुरूष दुहेरीत बेंगळुरूच्या रामकुमार रामनाथनने बंगालच्या श्रीराम बालाजीचा 11-9 असा पराभव बरोबरी साधली. मिश्र दुहेरीत बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवाने विष्णू वर्धनच्या साथीत बंगालच्या मारिया तिमोफिवा व अनिरुध्द चंद्रशेखर यांचा 14-6 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या लढतीत बेंगळूरु संघाला विजयासाठी 7 गुणांची आवश्यकता होती. पुरुष दुहेरीत बेंगळुरूच्या रामकुमार रामनाथन व विष्णू वर्धन यांनी बंगालच्या श्रीराम बालाजी व अनिरुद्ध चंद्रशेखर यांचा 7-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाचा 41-35 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून एरिना रोडीनोवा, रामकुमार रामनाथन, विष्णू वर्धन यांनी सुरेख कामगिरी बजावली.
दुसऱ्या सामन्यात मारिया तिमोफिवा, श्रीराम बालाजी यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बंगाल विझार्ड्स संघाने पंजाब पेट्रीएटस संघाचा 41-33 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्य फेरी:
बेंगळुरू एसजी माव्हरिक्स वि.वि.दिल्ली बिनीज ब्रिगेड 41-35(महिला एकेरी: एरिना रोडीनोवा वि.वि.सहजा यमलापल्ली 11-9; पुरूष एकेरी: रामकुमार रामनाथन वि. वि. डेनिस नोवाक 12-8; मिश्र दुहेरी: एरिना रोडीनोवा/विष्णू वर्धन वि.वि.सहजा यमलापल्ली/जीवन नेद्दूचेझियन 11-9; पुरूष दुहेरी: रामकुमार रामनाथन/विष्णू वर्धन पराभुत वि.जीवन नेद्दूचेझियन/डेनिस नोवाक 7-9);
बंगाल विझार्ड्स वि.वि.पंजाब पेट्रीएटस 41-33(महिला एकेरी: मारिया तिमोफिवा वि.वि.कोनी पेरीन 12-8; पुरूष एकेरी: श्रीराम बालाजी वि.वि.दिग्विजय प्रताप सिंग 13-7; मिश्र दुहेरी: मारिया तिमोफिवा/अनिरुध्द चंद्रशेखर बरोबरी वि. कोनी पेरीन/अर्जुन कढे 10-10; पुरुष दुहेरी: श्रीराम बालाजी/अनिरुध्द चंद्रशेखर पराभुत वि.दिग्विजय प्रताप सिंग/अर्जुन कढे 6-8);
अंतिम फेरी:
बेंगळुरू एसजी माव्हरिक्स वि.वि.बंगाल विझार्ड्स 41-28 (महिला एकेरी: एरिना रोडीनोवा पराभुत वि.मारिया तिमोफिवा 9-11; पुरूष दुहेरी: रामकुमार रामनाथन वि.वि.श्रीराम बालाजी 11-9; मिश्र दुहेरी: एरिना रोडीनोवा/विष्णू वर्धन वि.वि.मारिया तिमोफिवा/अनिरुध्द चंद्रशेखर 14-6; पुरुष दुहेरी: रामकुमार रामनाथन/विष्णू वर्धन वि.वि.श्रीराम बालाजी /अनिरुद्ध चंद्रशेखर 7-2).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय