पुणे, दि. २१ ( प्रतिनिधी)- कात्रजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून तलवारी, मिरचीपूड, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. उमेर आसिफ अन्सारी (वय २२, रा. कोंढवा) नोमान अस्लम खान (वय १८ रा. घोरपडी पेठ) यांच्यासह तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस हद्दीत गस्त घातल असताना, पुणे -सातारा रस्त्यावर एका हॉटेलच्या जागेत टोळक्याची हालचाल पोलिसांना दिसली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाउन उमेर, नोमासह टोळक्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, परिसरात दरोड्यासह वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम