पुणे : भारती विद्यापीठ पोलीसांनी केले घरफोडी करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

पुणे, 15 जून 2021 – घरफोडी करणाऱ्या एका रिक्षाचालकाला भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर रुस्तम शेख (वय 40, रा. आंबेगाव पठार ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरातील कात्रज परिसरातील महिलेच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. सीसीटीव्ही विश्‍लेषणाच्या आधारे अंमलदार रविंद्र चिप्पा व सचिन पवार यांना घरफोडी करणारा चोरी केल्यावर रिक्षातून निघून गेला असल्याचे दिसून आले. संबंधित रिक्षा चालक रिक्षा घेऊन कात्रज ते नवले ब्रिज असा व्यवसाय करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिस त्याचा शोध घेत असताना रिक्षाचालक नवले बिजकडुन कात्रजकडे येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता,तो रिक्षा न थांबवता पुढे निघून जावू लागला. मात्र त्याला अडवून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याचेकडून सहा हजार रुपये, कुलुप तोडण्यासाठी वापरलेला पान्हा आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमलदार रविन्द्र भोसले. रविंद्र चिप्पा, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड व सचिन गाडे यांनी केली आहे.