पुणे: पाण्यामुळे भिडे पूल वाहतुकीस बंद; वाहतूक विस्कळीत

पुणे, १२/०७/२०२२: संततधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतुन पाणी सोडण्यात आल्यामुळे डेक्कन जिमखाना भागातील भिडे पूल मंगळवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे डेक्कन जिमखाना परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

भिडे पुल बंद करण्यात आल्यानंतर डेक्कन जिमखाना भागातील आपटे रस्ता जंगली महाराज रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाला होता. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली होती. दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.