चिखली येथील १८ मीटर रस्त्याच्या कामाचे महापौरांनी केले भूमिपूजन

पिंपरी, १८/०१/२०२२ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.१ चिखली येथील धर्मराज नगर कडे जाणारा १८ मी रुंदीचा डी.पी.रस्ता विकसित करणे या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्र्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार महेश लांडगे, सात्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अँड. नितीन लांडगे, विधी समिती सभापती स्विनल म्हेत्रे,

फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्या साधना मळेकर माजी नगर नगरसदस्य सुरेश म्हेत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.१ चिखली चा समावेश होतो. या परिसराच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया चालू असून परिसर बहुतांशी विकसनशील स्वरूपाचा आहे, परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होण्याच्या दृष्टीने व परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करणेच्या अनुषंगाने मनपा विकास आराखड्यात समाविष्ठ विविध आरक्षणे तसेच रस्ते विकसित करण्याचे कामे महापालिकेमार्फत चालु आहेत.

या परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मनपाचे महत्वकांक्षी प्रकल्प जसे, संत पीठ, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जलशुद्धीकरण केंद्र, चिखली अग्निशमन केंद्र इ. या भागातच प्रस्तावित आहेत. सधस्थितीत या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता हा गावठाणातून जात असल्याने रस्त्याची रुंदी फार कमी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणे अपेक्षित असुन सदरची बाब विचारात घेता पर्यायी डी.पी. रस्ता सर्व सेवा वाहिन्यांसह विकसित करणे महत्वाचे आहे, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या