पुणे महापालिकेत १०० नगरसेवक निवडणूक आणून फडणवीस यांना भेट देणार- भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा विश्वास

पुणे, दि. २२/०७/२०२२ – पुणे महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हीच भेट असणार, असे विश्वास भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळिक यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकाराचा संपूर्ण कालावधीत भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले आहेत, तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे. भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज(२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यामुळे पुणे शहरात fवविध भागात आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. त्याशिवाय शहर कार्यालयात युवा मोर्चाकडून काही निवडक छायाचित्राच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. छायाचित्रांच्या प्रदर्शनाच उद्धाटन भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. ‘भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना. मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. मात्र अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना त्या नेत्यांनी केवळ स्वत: चा विकास करण्यावर भर दिला. त्यामुळे ‘आता पुन्हा आमची राज्यात सत्ता आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या विकासाला चालना देतील असेही त्यांनी सांगितले.