पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष, महापौर आणि नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करणे अंगलट

पुणे, ०१/०९/२०२१: राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आरतीसह घंटानाद केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या काही पुण्यातील नगरसेवकांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत कसबा गणपती मंदिरात आरतीसह घंटानाद केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आंदोलनास परवानगी नसताना भाजपने नियमांचे उल्लंघन करीत गर्दी जमवली होती. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन आणि कोरोना कालावधीत गर्दी जमविल्याबाबत संबंधित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षसह पुण्याचे महापौर आणि काही नगरसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.