पुणे, १२ जुलै २०२२: भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या शिष्टमंडळाने आज पावसाळी कामांच्या नियोजनातील निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त मा. विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण असलेली नालेसफाई, निकृष्ट दर्जाची पावसाळी कामे, अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत असलेला राडारोडा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुराच्या सुरक्षेचा धोका असणाऱ्या ठिकाणांची वस्तुस्थिती देखील यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.
वाढता पाऊस आणि संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी मुळीक यांनी केली.
मुळीक म्हणाले, ‘अती पावसाच्या कालावधीत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा याची दक्षता घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागात पोलीस प्रशासन पुणे महानगर परिवहन महामंडळ स्मार्ट सिटी यातील समन्वय महत्त्वाचा आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यात पडणारे खड्डे, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, मोठे नाले, पुरामुळे बाधीत होणारे परिसर, निवारा यांची संख्या, साधन सामग्री आदींबाबत तातडीचे नियोजन होणे आवश्यक आहे.’
यावेळी जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुशिल मेंगडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न