पुणे, 21 सप्टेंबर 2025: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत ब्लेझिंग
ग्रिफिन्स संघाने हॉक्स संघाचा 5-1 असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात अंतिम फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने हॉक्स संघाचा 5-1 असा पराभव केला. खुल्या दुहेरी 1मध्ये ग्रिफिन्सच्या अनिकेत शिंदे व मिहिर विंझे यांनी हॉक्सच्या अक्षय ओक व चिन्मय जोशी यांचा 21-07, 21-07 असा तर, खुल्या दुहेरी 2मध्ये ग्रिफिन्सच्या अविनाश दोशी व बिपीन देव यांनी हेमंत पाळंदे व पराग चोपडा यांचा 15-21, 21-16, 15-04 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. मिश्र दुहेरी 1मध्ये आकाश सूर्यवंशीने आरुषी पांडेच्या साथीत वरद चितळे व राधिका इंगळहळीकर यांचा 21-13, 21-20 असा पराभव करून ही आघाडी अधिक भक्कम केली. पण खुल्या दुहेरी 3मध्ये हॉक्सच्या अनुज मेहता व सिद्धांत खिंवसरा यांनी ईशान भाले व निखिल भाटे यांचा 21-10, 19-21, 15-11 असा पराभव करून ही आघाडी कमी केली. मिश्र दुहेरी 2मध्ये ग्रिफिन्सच्या आनंदिता गोडबोले व पार्थ केळकर यांनी अभिजीत खानविलकर व रिशिका आपटे यांचा 21-18, 21-13 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ, सह सचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक अश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, शिरीष साठे, आमोद प्रधान, दिप्ती सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
ब्लेझिंग ग्रिफिन्स वि.वि.हॉक्स 5-1(खुला दुहेरी 1: अनिकेत शिंदे/मिहिर विंझे वि.वि.अक्षय ओक/चिन्मय जोशी 21-07, 21-07; खुला दुहेरी 2: अविनाश दोशी/बिपीन देव वि.वि.हेमंत पाळंदे/पराग चोपडा 15-21, 21-16, 15-04; मिश्र दुहेरी 1: आकाश सूर्यवंशी/आरुषी पांडे वि.वि.वरद चितळे/राधिका इंगळहळीकर 21-13, 21-20; खुला दुहेरी 3: ईशान भाले/निखिल भाटे पराभुत वि. अनुज मेहता/सिद्धांत खिंवसरा 10-21, 21-19, 11-15; मिश्र दुहेरी 2: आनंदिता गोडबोले/पार्थ केळकर वि.वि.अभिजीत खानविलकर/रिशिका आपटे 21-18, 21-13).
इतर पारितोषिके
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट(पुरुष): बिपीन देव;
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट(महिला): राधिका इंगळहळीकर;
सर्वोत्कृष्ट खेळाडू गोल्ड दुहेरी: निखिल चितळे व प्रतीक धर्माधिकारी;
सर्वोत्कृष्ट खेळाडू सिल्व्हर दुहेरी: अभिषेक ताम्हाणे व यश मेहेंदळे;
सर्वोत्कृष्ट खेळाडू गोल्ड मिश्र दुहेरी: आरुषी पांडे व आकाश सूर्यवंशी;
सर्वोत्कृष्ट खेळाडू मिश्र सिल्व्हर दुहेरी: ईशान पारेख व आनंदिता गोडबोले;
सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रौढ गट: अविनाश दोशी व पराग चोपडा;
कॅप्टन चॉईस पुरस्कार(सर्वोत्कृष्ट पुरुष): आकाश सूर्यवंशी;
कॅप्टन चॉईस पुरस्कार(सर्वोत्कृष्ट महिला): आरुषी पांडे;
मॅच ऑफ द टुर्नामेंट: राधिका इंगळहळीकर/चिन्मय जोशी;
मॅच ऑफ द टुर्नामेंट: राजश्री भावे व तन्मय आगाशे.
More Stories
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय
रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत रावी कदम, मौसम माने पाटील, शौर्यतेजा पवार, आरुष सापले, अवनीश बांगर यांना दुहेरी मुकुट