आयकर आयुक्त कार्यालय आणि डीवाईन जैन ग्रुप ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 

पुणे, ८ जुलै २०२२ : अझडी का अमृत महोत्सवानिमित्त शहरातील स्वारगेट येथील आयकर विभाग येथे भव्य रक्तदान शिबिराचे गुरुवारी (दि.७) भव्य रक्तदान शिबिराचे

आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून एकूण ८३ बाटल्या रक्ताचा साठा जमा झाला.

आयकर प्रधान आयुक्त पुणे – 2 आणि डीवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन आयकर विभाग पुणे २ चे प्रमुख आयुक्त अपर्णा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयकर सह आयुक्त श्रेणी – ३ चे जीवन बच्छाव व पुण्याचे आयकर उपायुक्त संजीव वर्मा हे विशेष निमंत्रक म्हणून तर अतिरिक्त आयुक्त बी.एस राजपुरोहित, आयकर अधिकारी श्रीकांत पांडे, उद्योजक राजेश ओसवाल, डिवाइन जैन ग्रुप चे पंकज साखरिया, हार्दिक शहा, तेजपाल ओसवाल, चेतन जैन, तिमीर संघवी हे उपस्थित होते. शिबिरात सर्व आयकर आयुक्त, अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपला सहभाग नोंदवला. सहा. उपायुक्त अल्पना दुबे या स्वतः अंध आहेत, त्यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला.

या कार्यक्रमाचे संयोजन ट्रस्ट चे अध्यक्ष संकेत शहा यांनी केले होते. तसेच यावेळी ‘Divine Blood Life Line 24*7’ या हेल्पलाईन चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.