खड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

पुणे, १५/०९/२०२२: बांधकाम साईटवर खणण्यात आलेल्या खड्यातील पाण्यात बुडून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. नवीन बांधकाम करण्यासाठी हा खड्डा घेण्यात आलेला होता. त्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते.

 

कुमारस्वराज पदमाकर काळे (वय ०७, रा. कमल बाग सोसायटी, वाघोली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कुमारस्वराजचे काका सचिन काळे (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे.

 

त्यावरून बांधकाम कन्स्ट्रक्शनचे प्रो-प्रायटर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी दुपारी ही घटना घडली आहे.