दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी, अँबिशियस क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, डीव्हीसीए संघांची विजयी सलामी

पुणे, 7 नोव्हेंबर 2022- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी, अँबिशियस क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र,दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब मैदानावरील लढतीत अक्षय काळोखे(नाबाद 25 व 4-10) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लबवर 173 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी संघाने 44 षटकात 9बाद 237धावा केल्या. यात व्यंकटेश काणे 46, अमन मुल्ला 34, अथर्व काळे 38, अक्षय काळोखे नाबाद 25, ऋषिकेश सोनार 23, रोहित खरात 23 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. पुना क्लबकडून अखिलेश गवळे(4-42), सौरभ दोडके(1-48) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पुना क्लब संघ 24.1 षटकात सर्वबाद 64धावावर संपुष्टात आला. यामध्ये सौरभ दोडकेने 19, आर्यमन पिल्लेने 11 धावा केल्या. ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमीकडून अक्षय काळोखे(4-10), मोहम्मद आहतिस(2-7), व्यंकटेश काणे(2-18) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.  

अन्य लढतीत तनिश जैनच्या उपयुक्त 42धावांच्या खेळीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखानाचा 5 गडी राखून पराभव केला. तर, अश्कन काझी(3-21)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने डेक्कन जिमखानावर  6 गडीराखून विजय मिळवत दिमाखात सुरुवात केली. रोहित चौधरी(4-35 व 43धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघावर  1 गडी राखून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बारणे अकादमी मैदान: पीवायसी हिंदू जिमखाना: 43 षटकांत सर्वबाद 151धावा(श्रेयश वाळेकर 36(77,4×4), रोहित जाना नाबाद 36(44,5×4), साहिल मदन 20, नचिकेत वेर्लेकर 27, सचिन भोसले 2-33, संकेत फराटे 2-13, वैभव विभुते 2-16, तनेश जैन 2-34) पराभुत वि.अँबिशियस क्रिकेट क्लब: 28.5 षटकांत 155/5 (तनिश जैन 42(53,5×4,1×6), सिद्धांत दोशी 36(44,7×4), रोहित हाडके नाबाद 25, अतुल विटकर 20, रोहित जाना 2-35, नचिकेत वेर्लेकर 2-39); सामनावीर: तनिश जैन; अँबिशियस 5 गडी राखून विजयी;

पुना क्लब मैदान: ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी:44 षटकात 9बाद 237धावा(व्यंकटेश काणे 46(54,6×4,1×6), अमन मुल्ला 34(38,6×4), अथर्व काळे 38(36,5×4,1×6), अक्षय काळोखे नाबाद 25 (26,2×4,1×6), ऋषिकेश सोनार 23, रोहित खरात 23, अखिलेश गवळे 4-42, सौरभ दोडके 1-48) वि.वि.पुना क्लब: 24.1 षटकात सर्वबाद 64धावा (सौरभ दोडके 19, आर्यमन पिल्ले 11, अक्षय काळोखे 4-10, मोहम्मद आहतिस 2-7, व्यंकटेश काणे 2-18); सामनावीर:- अक्षय काळोखे; ब्रिलियंट्स क्रिकेट क्लब 173 धावांनी विजयी;
 
डीव्हीसीए मैदानः युनायटेड स्पोर्ट्स क्लबः 45.5 षटकांत सर्वबाद 188धावा(आकाश जाधव 35(43,2×4,1×6), अभिषेक पवार 33(53,1×4,2×6), अद्वैय शिधये 24, निखिल जोशी 21, ओंकार मोहिते 20, रोहित चौधरी 4-35, टिळक जाधव 2-9, मिझान सय्यद  2-14, अॅलन रॉड्रिग्ज 2-51) पराभुत वि.दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 45.5 षटकात 9बाद 189धावा(ओंकार राजपूत नाबाद 55(68,6×4), रोहित चौधरी 43(25,5×4,3×6), मिझान सय्यद 15, आकाश जाधव 4-23, आनंद ठेंगे 2-33); सामनावीर:-रोहित चौधरी; डीव्हीसीए संघ 1 गडी राखून विजयी;
 
पीआयओसी मैदान, लोणी: डेक्कन जिमखाना: 45.5 षटकात सर्वबाद 170धावा(अथर्व वणवे 34(44,4×4), स्वप्नील फुलपगार 25(55), अजय बोरुडे 23, आत्मन पोरे नाबाद 25, अश्कन काझी 3-21, आदिल अन्सारी 2-30, यश क्षीरसागर 1-15)पराभुत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 45.5 षटकात 4बाद 171धावा(यश क्षीरसागर 42(53,4×4,1×6), अनोश भोसले नाबाद 38(50,5×4,1×6), राजवर्धन उंद्रे 28, ओंकार येवले 26, सोहम कुमठेकर 3-39); सामनावीर:-अश्कन काझी; क्लब ऑफ महाराष्ट्र  6 गडी राखून विजयी.