कात्रज, मांगडेवाडीत घरफोडी, साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, ५ जुलै २०२१-शहरातील विविध भागात घरफोडीचे सत्र कायम आहे. बंद घराचे कुलूप तोडून ऐवज लुटून नेला जात आहेत. अशाच दोन घटनांमध्ये साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा मिळून ४ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री अकराच्या सुमारास कात्रजमधील कांचनगरी सोसायटीत घडली. याप्रकरणी किरण गंगाधर शेटे (वय ६०)  यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
किरण कुटूंबियासह कांचननगरी सोसायटीत राहायला आहेत. ३ जुलैला ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ३ लाख २० हजारांचे दागिने आणि रोकड असा मिळून ४ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून परत आल्यानंतर किरण यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसNया घटनेत चोरट्यांनी मांगडेवाडीतील शिवतीर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शुभांगी बापु पांगारे (वय ३७ ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.