पुणे, १७ मे २०२५ : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडाच्या वतीने (पीएमपीएमएल) प्रवाश्यांना तिकीट काढण्यास दिरंगाई करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तिकीट खरेदीस जर उशीर झाला, तर प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पीएमपीएमएलद्वारे देण्यात आला आहे.
कडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी प्रवासाच्या सुरुवातीला, बस थांब्यावरूनच तिकीट घेतले पाहिजे. तिकीट खरेदीस उशीर झाल्यास प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे.
तिकीट वितरण अधिक जलद आणि सुलभ करण्याच्या अनुषंगाने पीएमपीएमएलकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट प्रणाली सुरु करण्यात आली आहे. तसेच, सुट्ट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये निर्माण होणारे वाद टाळण्यासाठीही हा उपाय करण्यात आला आहे. परंतु, विविध निरीक्षणात असे आढळून आले आहे की काही प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर किंवा प्रवास सुरू झाल्यावर ऑनलाईन तिकीट घेत आहेत. यामुळे तिकीट तपासणीस अडथळा निर्माण होतो आणि नियमानुसार ती गंभीर उल्लंघनाची बाब आहे.
हीच बाब लक्षात घेत आता प्रवाश्यांना प्रवासाच्या सुरुवातीला, बस थांब्यावरूनच तिकीट घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महामंडळाने प्रवाशांना दिल्या सूचना:
-प्रवाशांनी बस थांब्यावरूनच तिकीट घ्यावे.
-ऑनलाईन तिकीट घेताना नेटवर्कच्या अडथळ्यामुळे तिकीट वेळेत न मिळाल्यास, प्रवाशांनी वाहकाकडून ई-मशीनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे.
– वेळेत तिकीट न घेतल्यास संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
दरम्यान या नियमावलीचे पालन केल्यास पीएमपीएमएलच्या तिकीट प्रणालीचा कार्यक्षम वापर करता येईल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व सुरक्षित होईल, असे ही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार