दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कॅडन्सचा अँबिशियस क्रिकेट अकादमीवर विजय

पुणे, 16 नोव्हेंबर 2022- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात आर्य जाधव(5-31) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅडन्स संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमीचा पराभव करुन विजय मिळवला.
बारणे क्रिकेट अकादमी मैदानावरील लढतीत डावखुरा फिरकी गोलंदाज आर्या जाधव(5-31)याच्या भेदक माऱ्यापुढे प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमीचा डाव 40.2 षटकात सर्वबाद 182 धावावर संपुष्टात आला. यात तनिश जैन 40, प्रशम गांधी 30, अतुल विटकर नाबाद 23, सरिश देसाई 22, निशांत नगरकर 21, अभिषेक ताटे 20 यांनी धावा केल्या. हे आव्हान कॅडन्स संघाने 44.5 षटकात 8बाद 183धावा करुन पुर्ण केले. यात ऋषिकेश मोटकरने 141 चेंडूत संयमपूर्ण फलंदाजी करताना 12चौकारच्या मदतीने नाबाद 90धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला निपुण गायकवाड 25, अजिंक्य गायकवाड 22 यांनी धावा काढून साथ दिली.अँबिशियसकडून तनिश जैन(3-24), रिषभ चव्हाण (2-47) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, पीवायसी हिंदू जिमखाना संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमी आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर स्पर्धेचा उपांत्य व अंतिम फेरीचा सामना अनुक्रमे 23 व 24 नोव्हेंबर रोजी पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर होणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पीवायसी हिंदु जिमखाना विरुध्द क्लब ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र यांच्यात तर दुसरा सामना अँबिशियस क्रिकेट अकादमी आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यात होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बारणे क्रिकेट मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 40.2 षटकात सर्वबाद 182धावा(तनिश जैन 40(48,5×4,2×6), प्रशम गांधी 30(52,4×4), अतुल विटकर नाबाद 23, सरिश देसाई 22, निशांत नगरकर 21, अभिषेक ताटे 20, आर्य जाधव 5-31, सिद्धेश वारघंटे 2-44, शुभम खरात 1-13, अथर्व चौधरी 1-51) पराभुत वि.कॅडन्स: 44.5 षटकात 8बाद 183धावा (ऋषिकेश मोटकर नाबाद 90(141,12×4), निपुण गायकवाड 25(35), अजिंक्य गायकवाड 22, तनिश जैन 3-24, रिषभ चव्हाण 2-47); सामनावीर – आर्य जाधव;कॅडन्स संघ 2गडी राखून विजयी.