पुणे, ०६/०८/२०२१: खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाने हातात पिस्तूल घेऊन केक कापला. याप्रकरणी संंबंधिताला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी मयत गुन्हेगाराच्या घराबाहेर १० ते १५ जण जमले होते. यांनी मयत गुन्हेगाराच्या नावाने घोषणा करुन केक कापत दहशत माजवली होती. अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर (२२ , रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सराईत गुन्हेगार भावेश कांबळे याचा गेल्या वर्षी खून झाला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खून झालेल्या आरोपीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ७ जुलैला ते जमले होते. त्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली होती. आरोपीच्या नावाने घोषणाबाजी केली होती.
जमलेल्यांमध्ये अक्षयदेखील होता. तो बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम