Pune University

पुणे विद्यापीठ वर्धापनदिन पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.१०/११/२०२२- गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठ वर्धापनदिनी उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, अध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी, विशेष उपक्रम व संशोधन, विद्यापीठ विभाग आदी पुरस्कार देण्यात येतात. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अध्यापकांचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधितांनी दिनांक २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचे आहेत. याविषयीचा अधिक तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.