पुणे, दि. १५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६२ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २९ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील सीडीएस ६२ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.
कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षेच्या पूर्व तयारी कोर्ससाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराने लोकसंघ आयोग (युपीएससी) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाई अर्ज केलेला असावा.
अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन