कॅपजेमिनीने अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह पुण्यातील आपले अस्तित्व विस्तारले

पुणे, 19 जानेवारी, 2023 : कॅपजेमिनी इंडिया आपले पुण्यातील अस्तित्व भक्कम करत आहेत आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. या माध्यमातून अधिक चैतन्यमय आणि उत्पादकता वाढविणारे वातावरण आणि कर्मचाऱ्यांचा अनुभव समृद्ध करणारे वातावरण तयार करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे गुणवंत मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आणि त्यांना भविष्याकरिता सज्ज करण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यात येत आहे. यासाठी ते या क्षेत्राशी तसेच शैक्षणिक वर्तुळाशी सहयोग करत आहेत. यात भारतभर 60 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यापैकी बहुतेक सामंजस्य करार महाराष्ट्रातील महाविद्यालयांसोबत करण्यात आले आहेत. पुण्यात 2020 पासून मनुष्यबळात 55% वाढ झाली आहे आणि पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ वाढविण्याचा कंपनीचा मानस आहे. पुण्यातील महाविद्यालयातील संभाव्य उमेदवार 2023 मध्ये कॅपजेमिनीमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे.

पुण्यातील तळवडे येथील 75,500 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या कॅपजेमिनीच्या कॅम्पसचे कंपनीची वृद्धी व सातत्यपूर्ण यशामध्ये धोरणात्मक मूल्य आहे. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जगभरातील अनेक देशांमधील वित्तसेवा क्षेत्रातील प्रमुख कस्टमर्सना याच ठिकाणाहून हाताळण्यात येते. या ठिकाणाचे धोरणात्मक महत्त्व पाहता कॅपजेमिनीने येथील पायाभूत सुविधा आधुनिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक इंटिरिअर, फर्निचर, वर्कस्टेशन्स इत्यादींच्या माध्यमातून या कॅम्पसचा चेहरामोहरा बदलून ते अधिक वेगवान व सहयोगस्नेही करण्यात येणार आहे.

पुण्यातील हिंजवडीमधील 1,50,000 चौरस मीटरमध्ये असलेल्या कॅम्पसला कंपनीची प्रगती व सातत्यपूर्ण यशाचा विचार करता धोरणात्मक महत्त्व आहे. जागेचा कमाल उपयोग करण्याच्या दृष्टीने आणि अभिनवता व उत्पादकता प्रतिबिंबीत करण्याच्या दृष्टीने या विस्तीर्ण कॅम्पसची रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी 30 कॉन्फरन्स रुम आहेत आणि 9 हाय-टेक प्रयोगशाळा असून कंपनीतील विविध महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हे कॅम्पस परिपूर्ण आहे. सहयोग व विविध प्रकारच्या कार्यपद्धतींना अनुकूल असे हे कार्यस्थळ आहे. पुण्यातील कॅपजेमिनीची आसनक्षमता 13,500 हून अधिक आहे.

पुणे कार्यालय हे 100% नवीकरणीय ऊर्जेवर चालते आणि या ठिकाणी त्यांचा बायोगॅस प्लँट आहे, जेणेकरून पुढील वापरासाठी कचरा रुपांतराची खातरजमा होईल. तळवडे व हिंजवडी कॅम्पसमध्ये असलेल्या सौर ऊर्जा प्लँट्समध्ये होणारी 3248 kWP निर्मितीसारखे उपक्रमांसारख्या विविध ऊर्जा कार्यक्षमता उपक्रमांमुळे पुणे कॅम्पसमधील ऊर्जावापर 43% कमी झाला आहे. एकूर्ण ऊर्जा आवश्यकतेच्या 25% ऊर्जेची आवश्यकता याच कॅम्पसमध्ये असलेल्या नवीकरणीय ऊर्जेमधून भागवली जाते आणि बाकीची नवीकरणीय ऊर्झा ग्रीन एनर्जी युटिलिटी उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त करण्यात येते.

कॅपजेमिनीच्या प्रत्येक संकल्पनेमध्ये शाश्वतता हा मध्यवर्ती घटक असतो आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करून कार्यक्षमता वाढविणे हे कॅपजेमिनीचे ध्येय आहे. कॅपजेमिनीची पुण्यातील सर्व कार्यालये 100% नवीकरणीय ऊर्जेवर चालतात. या कार्यालयांमध्ये इनहाऊस सौरनिर्मिती, बायोगॅस, वर्मीकम्पोस्ट खड्डे आणि वॉटर रिसायकलिंग प्लँट्स आहेत. यातून शाश्वत कार्यपद्धतींमध्ये आघाडीवर असण्याचा या संस्थेचा निर्धार दिसून येतो. सध्याच्या गुंतवणुकीसह पायाभूत सुविधा वाढवून अधिक ऊर्जा कार्यक्षम होण्याचे कॅपजेमिनीचे उद्दिष्ट आहे.

एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती असलेल्या जबाबदारीची कॅपजेमिनीला जाणीव आहे आणि शाश्वततेसाठी त्यांच्यातर्फे पुरेशी कार्यवाही करण्यात येत आहे. याच्याशी सुसंगत राहत, 2019 च्या बेसलाइनच्या तुलनेने 2040 पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये (1, 2 आणि 3) सर्व कार्बन उत्सर्जनात 90% कपात करण्याचे नेट झीरो लक्ष्य निर्धारित केले आहे. त्याच वेळी, कॅपजेमिनीने नजीकच्या काळासाठी (2030) महत्त्वाकांक्षी लक्ष्ये निश्चित केली आहेत. हे बदल ताज्या वातावरण विज्ञानाशी सुसंगत राहत वातावरण बदलाच्या समस्येला हाताळण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न प्रतिबिंबित करतात आणि नव्या SBTi मानकांनुसार निश्चित करण्यात आलेली नेट झीरो लक्ष्ये ठेवणारा कॅपजेमिनी हा पहिला ग्रुप झाला आहे.

कॅपजेमिनीबद्दल
कॅपजेमिनी हा बिझनेस टेक्नोलॉजी आणि डिजिटल सर्व्हिसेस पार्टनर असून व्यवसाय मूल्य निष्पत्ती साध्य करण्यावर ते लक्ष केंद्रीत करतात. सर्वसमावेशक व शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी ऊर्जा उलगडण्याच्या उद्दिष्टाने हा ग्रुप दररोज पुढे जात आहे. ही एक जबाबदार व वैविध्यपूर्ण संस्था आहे, ज्यांचे 50 देशांमध्ये 3,50,000 टीम मेंबर आहेत. त्यांचा 55 वर्षांचा वारसा व या क्षेत्रातील कौशल्य यामुळे कंपन्यांच्या व्यावसायिक गरजा म्हणजे धोरणांपासून डिझाइन ते कामकाजापर्यंत क्लाएंट्सचा कॅपजेमिनीवर विश्वास आहे. कॅपजेमिनीच्या कौशल्याला वेगाने परिवर्तीत होणारे व सतत नावीन्यपूर्ण होणारे क्लाउड जगत, डेटा, एआय, कनेक्टिव्हिटी, सॉफ्टवेअऱ, डिजिटल इंजिनीअरिंग व प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून हे साध्य होते. या ग्रुपतर्फे 2021 मध्ये 18 अब्ज युरोचा महसूल नोंदविण्यात आला.