पुणे, दि. २४/०८/२०२२- उत्तर प्रदेशातील अमौसी विमानतळावर आढळलेल्या पाच काडतुसांचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. संबंधित काडतुसे पुण्यातील अजिज अहमदच्या घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कार्गो पार्सलमधून ही काडतुसे पुण्यात पाठविण्यात येणार होती.
उत्तर प्रदेश व दिल्लीत घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद आणि त्याच्या साथीदारांना काही दिवसांपुर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नरसिंहानंदन सरस्वती, गायक संदिप आचार्य, जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी यांच्यावर हल्ला करण्याचे लक्ष्य होते.
उत्तर प्रदेशात भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन त्यांनी केला असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आता लखनौ विमानतळावर सापडलेल्या काडतुसांचे कनेक्शन उघडकीस आले आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा