मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे, 9/7/2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वागतासाठी खासदार गिरीश बापट, आमदार तानाजी सावंत

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने पुणे विभागाचे अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण केले.