चिंचवड : सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई करत पोलिसांकडून एकाच दिवसात सव्वा लाख रूपयांची दंडवसुली

मुबारक अंसारी
चिंचवड, २५ मे २०२१: लग्न समारंभ, पूजा, मॉर्निग वॉक, विनाकारण बाहेर फिरणे अशा विविध कारणांसाठी सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील पोलिसांनी नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत एकाच दिवसात सव्वा लाख रूपयांची दंडवसुली पोलिसांनी केली आहे.

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सायकल पेट्रोलींग दरम्यान कारवाई करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त कृष्णकुमार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चिंचबड येथील न्यु वुडस बैंक्वेट हॉल येथील लग्न समारंभात ३२ अधिक नागरिक आढळल्याने प्रत्येकी १००० रुपये याप्रमाणे ३२,००० रुपये आणि आस्थापनेवर १०,०००/- असे एकुण ४२,००० रुपयांची दंडात्मक कारबाई केली. याव्यतिरिक्त चिंचवड येथील काकडे पार्क सोसायटीतील राजेश लोट यांनी घरी लग्ना आगोदर पुजेदरम्यान मिरवणुक काढल्याप्रकरणी त्यांच्यावर १०,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

चिंचवड येथे सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत नदीपत्रालगत वॉकिंगसाठी बाहेर पडून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण ९२ नागरिकांवर सायकल पेट्रोलींग दरम्यान कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४६,००० रुपये व एका आस्थापना चालकाकडुन ५००० रुपये दंड वसुल करण्यात आला.

तसेच चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील चापेकर चौक व ईंगल हॉटेल येथे नाकाबंदी दरम्यान विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या एकुण ४४ नागरिकांकडून २२००० रुपये दंडवसुली करण्यात आली.

ही कारबाई पोलीस आयुक्त शकृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पिंपरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलिस निरीक्षक सुधाकर काटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, पोलिस उपनिरीक्षक माने, पोलिस नाईक संतोष फावडे, विनोद साळवे,सुधाकर आवताडे, अदिनाथ नांगरे, श्रध्दा भरगुडे, स्वप्निल शेलार, पोलिस शिपाई सुरज उबाळे, प्रभाकर खाडे,माळी, ग्रामसुरक्षा रक्षक प्रसाद कुदळे यांनी केली.