पुणे: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी  समृध्द जीवनच्या कार्यालयात सीआयडीची छापेमारी

पुणे,  ०१/०७/२०२१: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पथकाने  गुरुवारी समृध्दी जवीन पतसंस्थेतील  औंध परिसरातील भूमकर चौक, नNहे आंबेगाव, धाराशिव  येथील कार्यालय, फ्लॅटमध्ये छापेमारी करीत महत्वपूर्ण कागदपत्रे, फाईल्स जप्त केली. अशी  माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली आहे.

समृद्द जीवनचे संस्थापक महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवर  यांच्याकडे सीआयडीने चौकशी केली होती. त्यावेळी तिने पतसंस्थेच्या कागदपत्रांबाबत माहिती  दिली.  अनेक गुंतवणुकदारांना   पैसे द्यावयाचे असून त्याबाबतचे फाईल नेमके कुठे आहे याची माहिती वैशाली यांनी सीआयडीला दिली होती. त्यानंतर गुरुवारी सीआयडीचे पथकाने पुणे व धाराशीवमध्ये तीन ते चार ठिकाणी छापे टाकले. यावेळी फॉरेन्सिक ऑडीटचे पथकही सीआयडीच्या मदतीस होते. संबंधित छापेमारी करण्यात आलेल्या फ्लॅट व ऑफिसेस मध्ये मोठया प्रमाणात कागदपत्रे   जप्त करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांचे विश्लेषण केल्यानंतरच आवश्यक ती माहिती सीआयडीला मिळणार आहे.