२० आॅक्टोबरपासून महाविद्यालय सुरू होणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे , 13/10/2021: येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील सर्व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेऊन तारीख जाहीर नक्की करू असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानुसार आता २० आॅक्टोबरपासून महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा सामंत यांनी केली.

 

महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांना पाठवला होता. त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर सामंत यांनी घोषणा केली.

 

महाविद्यालयात ५० टक्के विद्यार्थी उपस्थित राहू शकतील. विद्यार्थ्यांसाठी खास लसीकरण मोहिम आयोजित केली जाणार आहे.

सामंत यांच्या घोषणेमुळे राज्य भरातील महाविद्यालय सुमारे दीड वर्षानंतर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पुणे महापालिकेने १३ आॅक्टोबरपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. पण उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पुण्यातील महाविद्यालये देखील सुरू होतील.