21 एप्रिल ते 16 मे 2021 या कालावधीत करण्यात येत असलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी-निहाय नियोजन

नवी दिल्ली, 8 मे 2021: देशातील 21 एप्रिल ते 16 मे 2021 या कालावधीत करण्यात येत असलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी-निहाय नियोजन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात आले आहे. औषध वितरक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हे नियोजन करण्यात आले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या पुरवठा नियोजनानुसार रेमडेसीवीर औषधाचा पुरवठा योग्य वेळी केला जात आहे, याची सुनिश्चिती करून घेण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना काल करण्यात आलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याच्या प्रक्रियेचा विस्तार करीत हे नियोजन करण्यात आले आहे.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1716744

रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी निहाय नियोजन