पुणे, 14 मे 2021 – सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबीय आणि इतर राजकीय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना सोशल मीडिया समन्वयक जयदीप पडवळ आणि आदित्य चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लखोबा लोखंडे, पी. टी. सुशील गौतम, सिद बुकारिया, धनंजय भोसले यांच्यासह इतर काही ट्विटर आणि फेसबुक वापरकर्त्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी ट्विटर आणि फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर संदेश प्रसारित करून बदनामी केली आहे. या नेत्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकीकास बाधा आणण्याच्या प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी तपास करीत आहेत.
More Stories
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश