October 24, 2025

स्मार्ट सिटीवरून काँग्रेसची भाजपवर टीका – पुणेकरांना फसविल्याचा मोहन जोशींचा आरोप

पुणे, ११ एप्रिल २०२५ ः ” स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण शहर स्मार्ट होणे तर दूरच राहीले, मात्र आगोदरच विकसीत असलेल्या परिसर देखील स्मार्ट होऊ शकला नाही. आता तर स्मार्ट सिटी योजनाच बंद पडली आहे, त्यामुळे भाजपने स्मार्ट सिटी करण्याचे पुणेकरांना दिलेले आश्‍वासन पूर्ण न करता पुणेकरांची फसवणूक केली’ अशी टिका माजी आमदार व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी योजने अनेक प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जोशी यांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. जोशी म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील १०० शहरे “स्मार्ट सिटी’ करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश होता. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. या भागात ही योजना अपयशी ठरली आहे. निवडणुकांमध्ये भाजप नेत्यांनी पुणेकरांना मोठमोठी आश्‍वासने दिल्याने पुणेकरांनी त्यांना मतदान केले. आता मात्र स्मार्ट सिटीची कुठलीही उद्दिष्टे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे भाजपने पुणेकरांची फसवणूक केली आहे.’