पावसाचे प्रमाण विचारात घेऊन
पाण्याचा विसर्ग करावा- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, २०/८/२०२१: जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाची माहिती घेऊन त्या अनुषंगाने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कालवा समितीच्या बैठकीत आज ( शुक्रवारी )केली.

यंदा मोसमाच्या सुरुवातीला पाऊस चांगला झाला, पण सध्या बराच खंड पडला आहे. हे लक्षात घेऊन पाणी वाटपाचे नियोजन व्हावे आणि राज्य शासन – पुणे महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन केले पाहिजे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.