पुणे: ठेकेदाराने कामगाराला पहिल्या मजल्यावरून दिले फेकून

पुणे, ३०/०८/२०२१:पगारामुळे झालेल्या वादावादीतून    ठेकेदाराने कामगाराला पहिल्या मजल्यावरुन फेकून दिल्याची घटना वडगाव खुर्द येथील व्योमकेश हाईटमध्ये घडली. याप्रकरणी दोघांना सिंहगह पोलिसांनी अटक केली आहे.

संजय मुरलीधर तुंबर(४६) आणी रामचंद्र किसन वाघचौरे (३६, रा.वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंतसीर हासीफ आलम (वय २१)  असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

बांधकाम साईटवर कामावरुन आणि पगारामुळे झालेल्या वादातून संजय आणि रामचंद्र कामगार जुनेदला  मारहाण करीत होते. त्यावेळी फिर्यादी आलम  त्याठिकाणी दोघांनाही  तुम्ही कामाबाबत आमच्या ठेकेदाराशी बोला असे बोलला. त्याचा राग मनात धरुन आरोपींनी आलमला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जबरदस्तीने जिन्याने ओढत पहिल्या मजल्यावर नेले. तेथे पुन्हा बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. संबंधीत इमारतीच्या कामाचा ठेका आरोपींनी घेतला आहे. आलम हा ठेकेदारामार्फत तेथे काम करतो. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खेडकर करत आहेत.