पुणे, १८/०८/२०२१: बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या जोडप्याला तीन जणांच्या टोळक्याने लुटल्याची घटना १६ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. टोळक्याने तरूणीवर चाकूने वार केल्यामुळे बेशुध्दावस्थेत तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरिफ इसाक शेख (२९, धंदा टेलर, रा. पुणे स्टेशन) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आरिफ यांचा टेलरिंगचा कारखाना असून त्याचा कोंढव्यात राहणाऱ्या मैत्रीणीबरोबर विवाह ठरला आहे. ते १६ ऑगस्टला रात्री पावणे अकराच्या सुमारास मोटारीतून बापदेव घाटात फिरण्यासाठी गेले होतो. फिरुन झाल्यानंतर घरी येण्यासाठी घाटातून खाली उतरत असताना, शेवटच्या वळणावर उजव्या बाजूला मैत्रिणीला नैसर्गिक विधीसाठी जाण्यासाठी आरिफने गाडी थांबवली. यावेळा आरिफ गाडीतच बसून राहिला असता त्याला मैत्रीणीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. तो गाडीतून बाहेर येवून मैत्रीणीच्या दिशेने धावत गेला. तेव्हा त्याला मैत्रीणीसोबत तीन व्यक्ती झटापट करताना दिसले. त्यांनी मैत्रीणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली.
तीच्यावर चाकूने वार केले. आरिफने त्यांना विरोध केला असता, टोळक्याने त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांनी पैशांचे पाकिट चोरट्यांना दिले. दरम्यान, मैत्रीणीच्या मानेवर, हातावर वार झाले असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. टोळक्याने सोन्याची चेन व रोख हजार रुपये असा २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद