पुणे: प्रवाशांवर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना अटक, पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ची कारवाई

पुणे, २० जून २०२१: स्वारगेट परिसरात रस्त्याने पायी जाणा-या, येणा-या बस प्रवासी व इतर लोकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ कडून अटक करण्यात आली. दरम्यान एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील एस. टी. अधिकारी वसाहत येथील सिंहगड बिल्डींग शेजारील सार्वजनिक जनसेवा शौचालय येथे रोडच्या कडेला, अंधारात काही गुंड प्रवृतीचे लोक हत्यारे बाळगून रस्त्याने पायी जाणा-या येणा-या बस प्रवासी व इतर लोकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मोहसीन शेख व उत्तम तारु यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळाली. त्यावर लागलीच कारवाई करण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार करुन संबंधित ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला. त्याठिकाणाहून पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. युवराज नामदेव गायकवाड ( वय -३१ वर्षे रा. सेटलमेंट कॉलनी नं. २ सोलापुर), बजरंग बलभीम गायकवाड (वय – ४५ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी, म्हसोबा मंदीर जवळ, मुंढवा, पुणे ), संतोष छोटु जाधव (वय – ३७ वर्षे रा.सर्वोदय कॉलनी, जमालबाबा दर्ग्याचे शेजारी, मुंढवा, पुणे), प्रभु बाबुराव जाधव (वय -५४ वर्षे रा. सेटलमेंट कॉलनी नं. ६, सोलापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर बलभीम गायकवाड ( रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापुर) असे पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्याकडून एक छोटी तलवार, कटर व मिरची पावडरची पुडी, अशी एकूण २७५ रुपये किंमतीची साधन सामग्री आढळली. त्यांच्याविरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नंबर १०४/२०२१ भा.द.वि.क. ३९९,४०२, आर्म अँक्ट क. ४(२५), म.पो.अऑक्ट कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्‍त अभिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे,सहा.पोलीस आयुक्‍त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहा.पोलीस निरी. प्रकाश मोरे, वैशाली भासले, सहा.पो.फौज.यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार संजय जाधव, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, मोहसीन शेख, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, चेतन गोरे, निखिल जाधव, समिर पटेल, गजानन सोनुने, गोपाळ मदने, अरुणा शिंदे यांनी केली आहे.