पुणे: टोळक्याने केला सराईताचा खून

पुणे,  ११/०७/२०२१: दत्तवाडी परिसरात एका सराईताचा टोळक्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्यकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली आहे. अक्षय किरवे (वय ३०)  असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षय सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरूद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अक्षय मांगीरबाबा चौकातून जात असताना, टोळक्याने त्याचा पाठलाग केला.

त्याच्यावर वार करून  टोळके  खून करीत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी धाव घेउन, आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली आहे.