25000डॉलर पुरूष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या डॉमिनिक पालन याला विजेतेपद

मुंबई, 20 नोव्हेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित 25000डॉलर आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या डॉमिनिक पालन याने विजेतेपद संपादन केले.
जीए रानडे टेनिस सेंटर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पुरुष गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या डॉमिनिक पालन याने जपानच्या रियूकी मत्सुदाचा 6-4 ,6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.  हा सामना 1 तास 47 मिनिटे चालला. पालन याने रियुकीची दोन्ही सेटमध्ये एक सर्व्हिस भेदली व मत्सुदाविरुद्ध 6-4,6-4 असा विजय मिळवला. स्पर्धेतील विजेत्या डॉमिनिक पालनला 25 एटीपी गुण आणि 3600डॉलर तर उपविजेत्या रियूकी मत्सुदाला 16 एटीपी गुण आणि 2120डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली.
 
 स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ सुपरवायझर नितीन कन्नमवार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: पुरुष: 
डॉमिनिक पालन(चेक प्रजासत्ताक)[4] वि.वि. रियूकी मत्सुदा(जपान) 6-4 ,6-4.