पुणे, २३ जुलै २०२५ ः पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धायरी फाटा ते रायकर मळा या मार्गावर दररोज जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी, नागरिक तासन्तास रस्त्यावर अडकून राहतात. विशेष म्हणजे, या समस्येवर वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या मार्गावर जड वाहने दिवसभर सर्रासपणे धावतात. या वाहतुकीसाठी कोणतेही पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळकरी मुले आणि नोकरदार वर्ग यांना रोजच वेळेआधी घर सोडावे लागते, तरीदेखील वेळेवर शाळा किंवा कामावर पोहोचणे अशक्य होते. अनेक वेळा नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत थांबावे लागते.
दरम्यान वाहतूक विभागाद्वारे अशा जड वाहनांवर कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. ना वेळेचे बंधन, ना वाहतूक नियंत्रण – परिणामी नागरिकांना रोजच्या जीवनात त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा एकच सवाल आहे –
“वाहतूक विभाग जड वाहतुकीवर कारवाई कधी करणार?” प्रशासनाकडून या भागातील वाहतूक समस्या गांभीर्याने घेतली जावी आणि जड वाहनांना नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नागरिकांची तीव्र मागणी आहे.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल