26 जुलै पर्यंत शहरातील पाणी कपात मागे

पुणे, १० जुलै २०२२: खडकवासला धरण प्रकल्पात जवळपास आठ टीएमसी पाणी जमा झाल्याने पुणे महापालिकेने एक दिवसाआड अशी पाणी कपात लागू केली होती ती आता मागे घेण्यात आलेली आहे 26 जुलै पर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा केला जाईल असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी कळविले आहे.

 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा मधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक 4 ते 11 जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर 10 तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक 8 ते 11 जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक 11 जुलै पाहून दिनांक 26 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक 26 जुलै नंतर पाणी वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो अलाहिदा कळवण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी