फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी

पुणे, दि. ११ मे २०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्र्याला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. वडगाव शिंदे, हवेली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

काकडे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने ७ मे ला फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्रचे स्टेशनरी विक्रीचे दुकान आहे. त्याने घटनात्मक पदाचा आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणून-बुजून केले आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.