पुणे, २४ ऑगस्ट २०२२: ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून घेतलेले कर्ज फेडून देखील तिच्याकडे पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा लावला. मात्र तिने दुर्लक्ष केल्यानंतर सायबर भामट्यानी तिचे फोटो मॉर्फ करून तिच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार नुकताच येरवडा परिसरात उघडकीस आला.
ही तरुणी ही एका फायनान्स कंपनीत नोकरी करते. तिच्या मोबाईलवर ऑनलाइन कर्जासंदर्भात एक लिंक आली होती.ती लिंक डाऊनलोड केल्यानंतर तिने त्या अॅपवर आपली सर्व वैयक्तिक माहिती भरली. त्याद्वारे तिला कर्ज मिळाले. यानंतर तिला दोन वेळा लिंक आल्या. त्याही तिने क्लिक करुन कर्ज मिळवले. ते कर्ज तिने वेळेत फेडले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येण्यास सुरुवात झाली. त्याद्वारे तिला अतिरिक्त पैशाची मागणी केली जाऊ लागली. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तरुणी काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून सायबर भामट्याने तिच्या मोबईलच्या व्हॉट्सअॅपवर तिचे छायाचित्र मॉर्फ करुन तिच्या संपर्कांत व्यक्तींना पाठवले. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे तपास करीत आहेत.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू