डेल्टा प्लसचा धसका: पुण्यात निर्बंध पुन्हा कडक, बाजारपेठ चार वाजता होणार बंद

पुणे, २६/०६/२०२१: राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढल्याने राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आता सोमवारपासून (ता२८) पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.

सर्व दुकाने दुपारी चार वाजता बंद होऊन सायंकाळी पाच वाजता शहरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. आत्यावश्‍यक सेवा सोडून इतरांसाठी विकेंड लॉकडाऊन कायम आहे. तर, शहरातील मॉलला पुन्हा एकदा टाळे लावण्याची वेळ आली आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आज (शनिवारी)आदेश काढले आहेत.

शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी व आॅक्सिजन बेड वापराचे प्रमाण २५ टक्के पेक्षा कमी झाल्याने गेल्या दोन आठवड्यापासून दुसऱ्या स्तरातील निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सायकांळी सात पर्यंत बाजारपेठ सुरू होती तर रात्री १० नंतर संचारबंदी लागू केली होते. मात्र, आता पुन्हा एकदा वेळेचे बंधन वाढविल्याने आर्थिक व्यहार मंदावण्याची भीती आहे.

पीएमपी सुरू, मॉल बंद

नव्या निर्बंधानुसार पीएमपी बस सेवा ५० टक्के क्षमतेने सुरु राहिल. शहरातील मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मॉल मधील दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आल्याने व्यावसायिकांसमोरील संकट वाढले आहे.

असे आहेत नवे निर्बंध

– आत्यावरश्‍यक सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी चार सुरू राहतील.

– आत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार उघडी राहतील

 – मद्यविक्रीचा दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत खुली रहातील.

– शनिवार व रविवारी मद्याची डोम डिलिव्हीरी मिळेल

– रोज सायंकाळी पाच वाजता शहरात संचारबंदी लागू होईल

– हॉटेल, रेस्टोरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू असतील

– आठवड्याचे सर्व दिवस हॉटेलची पार्सल सेवा रात्री ११ पर्यंत सुरू राहिल

– लोकल सेवा केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असेल

– सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने, सायकलीग – पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली

– खासगी कार्यालये सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचारी क्षमता सुरू असतील

– आऊटडोर क्रिडांगणे सकाळी ५ ते ९ सुरू राहतील

– सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन कार्यक्रमास सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थितीस मान्यता

– हे कार्यक्रम तीन तासापेक्षा जास्त काळ सुरू ठेवता येणार नाहीत

-धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद असतील, केवळ दैनंदिन पूजेस परवानगी

– ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभाना मान्यता

– अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीत मान्यता

– रहाण्याची सोय आहे अशा बांधकाम प्रकल्पावर दुपारी ४ पर्यंत काम करण्याची मुभा

– शेती विषयक कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत करता येतील.

– जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू, एसी बंद ठेवावा लागणार

– शनिवारी व रविवारी ही दुकाने बंद असतील.

– सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार

– ई कॉमर्स नियमित वेळेत सुरू राहिल

– माला वाहतूक नियमित वेळेत सुरू राहिल

– आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाह., मात्र, पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात प्रवासासाठी ई- पास अनिवार्य

-अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर नियमित वेळेत सुरू राहतील