न्यूड फोटो शूट मुळे अभिनेता रणवीर सिंग ला अटक करण्याची मागणी : निलेश काळे 

पुणे, २७ जुलै २०२२ : अभिनेता रणवीर सिंह याचे हे कृत्य समाजमान्य नाही , सोशल मीडियावर अशाप्रकारचे न्यूड फोटो अपलोड करून हिंदू संस्कृतीचा अपमान होत आहे. त्याचबरोबर असे न्यूड फोटो अपलोड करून लहान मुलांवर वाईट संस्कार होण्याची भीती आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी किंवा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी निलेश काळे यांनी केली आहे.

रणवीर सिंहप्रमाणे इतर अभिनेतेही असे कृत्य करतील आणि तेही प्रसिद्ध होतील. हे अतिशय चुकीचे असून, आयपीसी कलम ३५४,५०९ ,६७ अ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काळे यांनी केली आहे. ऍड. त्यांना सुरज जाधव यांनी सहयोग केले. यावेळी उपस्थित मनसे शारीरिक सेना पदाधिकारी कौस्तुभ भगवान, सागर हरवळकर, अविनाश चव्हाण, भाग्येश दिवेकर व इतर राजसमर्थक उपस्थित होते.

सिंह याने

 

स्त्रियांनाही, लहान मुला-मुलींना हा फोटो बघताना लाज वाटत असेल त्यामुळे असं कृत्य त्याने करू नये. तो एक उत्तम अभिनेता आहे. सगळ्यांच्या आवडीचा आहे. तरीदेखील त्यांना समाजाचे भान राखायला हवं. हिंदू संस्कृती जपायला हवी. सोशल मीडिया हे माध्यम प्रसिद्ध होण्याचे माध्यम आहे त्यातून अनेक गोष्टी शिकता पण येतात मात्र त्यावर असे न्यूड फोटो अपलोड करून लहान मुलांवर वाईट संस्कार होण्याची भीती आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी किंवा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निलेश काळे यांनी केली आहे. रणवीर सिंहसारखं हे कृत्य इतर अभिनेतेही करतील आणि तेही प्रसिद्ध होतील त्यामुळे या अभिनेत्याला चाप बसला पाहिजे, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण शारिरीक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. ऋषि शेरेकर यांची राजगड इथे येऊन माफी मागावी, तरच त्याचे चित्रपट थेटर मध्ये चालू देऊ, असा इशाराही काळे यांनी दिला.