सविता शिळिमकर यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ अंगणवाडीताईंची जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने

पुणे, दि. 20 एप्रिल 2021: सविता शिळीमकर, दिपाली जोशी यांना न्याय मिळालाच पाहिजे,कोव्हीड काळात अंगणवाडी ताईंना सुरक्षा मिळालीच पाहिजे, मास्क, ग्लोज, सॅनिटायजर, फेसशिल्ड व पिपीई किट प्रशासनाने पुरवलेच पाहिजे, विमा भरपाई लवकरात लवकर मिळालीच पाहिजे, उपचाराची सर्व व्यवस्था व खर्च शासनाने केलाच पाहिजे अश्या मागण्यांचे फलक हातात घेवून आज अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शनेकरण्यात आली. करोना संसर्गाचे भान राखून प्रत्येक प्रकल्पातील एका प्रतिनिधीचाच समावेश असलेली ही मुक व प्रातिनिधिक निदर्शने झाली. आघाडीचे कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर संबोधून अंगणवाडी ताईंना करोना प्रादुर्भावात व  टाळेबंदी काळातही प्रशासनाकडून कार्यकक्षेत्रातील कामे सांगितली जातात. मात्र त्यासाठी मास्क,ग्लोज,सानिटायजर,फेसशिल्ड आवश्यक तेथे पिपीई किट इ. सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जात नाहीत. तसेच बाधित झाल्यास त्याची जबाबदारी व खर्च अंगणवाडीताईंनाच घ्यावी लागत आहे. यातच अंगणवाडी ताईंचे कुटुंबियही त्यांच्या बरोबर बाधित होवू लागले आहेत. याच परिस्थितीमुळे सविता शिळीमकर या करोना बाधित झाल्या. उपचाराची त्वरीत व प्राधान्याने सोय न झाल्याने त्यांचे 14 एप्रिलला गावी असलेल्या इस्पितळत निधन झाले.शिळीमकर व दीपली जोशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ आज ही निदर्शने झाली. सभेचे अध्यक्ष नितिन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात एड. मोहन वाडेकर, सुनन्दा साळवे, शैलजा चौधरी, अनीता आवळे, घोरपडे, एड. मोनाली अपर्णा, कल्याणी रवींद्र आदी सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना समक्ष निवेदन देण्यात आले. त्यात पुढील मागण्या  करण्यात आल्या. सद्य परिस्थितीने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत. करोनाबाधेचे संकट अंगणवाडी ताईंच्या घरातील सदस्यांनाही घेरत आहे. ज्यांना मरण पत्करावे लागले ते व्यर्थ जावू नये. म्हणून श्रद्धांजलीच्या पुढे जावून वस्तुस्थितीचा विचार आपण करावा आणि निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे.

1. सुरक्षा- अ. अंगणवाडी ताईंना लावण्यात आलेले  फ्रंटलाईन वर्कर हे बिरुद ‘ केवळ काम के वास्ते ‘ राहू नये. अंगणवाडीताई फ्रंटलाईन वर्कर असतील तर काम करताना मास्क,ग्लोज,सानिटायजर,फेसशिल्ड आवश्यक तेथे पिपीई किट प्रशासन पुरवलेच पाहिजेत.

ब॰ करोना बाधित झाल्यास उपचाराची सोय त्यात प्राधान्याने बेड मिळणे ते उपचाराची सर्व व्यवस्था/खर्च  शासनाच्या वतीने झाली पाहिजे.

क. फ्रंटलाईन वर्करला लागू असलेला व सध्या मुदत संपलेला विम्याची सुरक्षा पुढे चालू राहावी. त्याची मुदत करोना संकट असेपर्यन्त वाढवावी.

ड. पोलिस,आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचारी यांच्या प्रमाणेच अंगणवाडीताईंचे सरसकट (वयाची अट न घालता ) व प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी प्रकल्पनिहाय लसीकरण मोहीम आयोजित करावी. अंगणवाडीताईंनीच इतर नागरिकांप्रमाणे नोंदणी करून ती करून घेण्यावर ही बाब सोडून देवू नये. इ.करोना बाधित असण्याच्या व पुढील एक महिन्याच्या काळातीळ मानधन कपात करू नयेत.

2. सद्य परिस्थितीत अनावश्यक कामासाठी अंगणवाडी वा सर्व्हेत अंगणवाडीताईंना जावे लागू नये. ही माफक अपेक्षा आहे. तसेच THR वाटपासारख्या महत्वाच्या कामासाठी एखाद्या वेळेस सर्व्हेत जाण्याचीही अंगणवाडी ताईंची तयारी आहे. अंगणवाडीची आवश्यक कामे फोनचा वापर करून व ऑनलाईन महिती भरून मागील टाळेबंदी प्रमाणे करण्यास त्या तयार आहेत.

3.सविता शिळीमकर,दीपाली जोशी अश्या करोनाने बाधित व  मृत्यू पावलेल्या अंगणवाडीताईच्या वारसांना विमा भरपाई लवकरात लवकर मिळावी. त्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी.

वरील क्र.2च्या मागणीविषयी संबंधितांस ताबडतोब सुचना द्याव्यात.