खडकवासल्यातून रात्री १२ वाजता ८५६ क्युसेकचा विसर्ग सुरू होणार

पुणे, ११जुलै २०२२ : खडकवासला धरण प्रकल्पात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पानशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला या चारही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरणात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाल्याने या धरणातून नदीमध्ये ८५६ क्युसिक इतके पाणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास यामध्ये आणखीन वाढ होऊ शकणार असल्याने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केलेले आहे.

खडकवासला धरणातील पाणी वाढल्यामुळे आज दुपारीच कॅनॉल मधून १००५ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर आता रात्री बारा वाजता धरणातून नदीमध्ये पाणी सोडले जाणार आहे.

धरणाच्या पाणी पातळीमधील वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज रात्री ठीक १२ वाजता सांडव्यातून ८५६ क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त केला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे