शिधापत्रिकाधारकांना एप्रिलच्या धान्यासोबत मार्चच्या धान्याचे वितरण

पुणे, 4/4/2022: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे मार्च २०२२ चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना मार्चचे धान्य एप्रिल २०२२ च्या धान्यासह उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच सार्वजनिक ‍वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब १ किलो याप्रमाणे देण्यात येणारी माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२२ या तीन महिन्याची साखर वेळेत स्वस्त धान्य दुकानात न पोहोचल्यामुळे एप्रिल महिन्याच्या वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.