पुणे, ५ डिसेंबर २०२२: ‘सात-बारा’चे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाराजस्व अभियानांतर्गत ७-१२ अर्थात ७ डिसेंबर या तारखेचा योग साधून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन केले आहे.
नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून फेरफार अदालत आयोजित करण्यात येते. यावेळी फेरफार अदालतीशिवाय सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करणे आदी कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत