पुणे, 5 नोव्हेंबर 2025: भारत पेट्रोलियम यांच्या तर्फे 44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात दिविज शरण, प्रतीक शेरॉन, अपूर्व जैसवाल, भारत राजगर यांनी, तर महिला गटात प्रार्थना ठोंबरे, सोहिनी मोहंती यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सुरुवात केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी आजपासून झालेल्या या स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात पहिल्या फेरीत आयओसीएल च्या दिविज शरण याने एचपीसीएलच्या करण पांचालचा 6-0 असा तर, जीएआयएल च्या प्रतीक शेरॉन ने ओआयएल च्या रक्तिम भुयानचा 6-0 असा सहज पराभव केला.
महिला एकेरीत आयओसीएल च्या प्रार्थना ठोंबरे हिने बीपीसीएल ब च्या एमएस मैथिलीला 6-1 असे पराभूत केले.
सांघिक गटात पुरुष गटात साकेत मायनेनी, प्रतीक एस यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर जीएआयएल संघाने इआयएल संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. प्रौढ गटात राज कुमार दुबे, महेश शर्मा यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर बीपीसीएल अ संघाने इआयएल संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. याआधी स्पर्धेचे उद्घाटन बीपीसीएलच्या चीफ विजिलंस ऑफिसर मीनाक्षी रावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे एचआर विभागाचे संचालक राज कुमार दुबे, बीपीसीएलचे क्रीडा विभागाचे सर व्यवस्थापक दिपक जैन, पीएसपीबीच्या सदस्य सचिव सबिना चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: सांघिक गट: उपांत्यपूर्व फेरी: पुरुष:
ओएनजीसी वि.वि. एचपीसीएल 2-0(व्हीएन रणजीत वि.वि.सनी राज 8-0; विष्णू वर्धन वि.वि.गौतम जी 8-1);
ओआयएल वि.वि.बीपीसीएल 2-1 (इफ्तिखार शेख वि.वि.सूर्यकांत 8-0; राजू कुमार पराभुत वि.अनंत मणी 0-8-; दुहेरी: 2-1 (इफ्तिखार शेख/राजू कुमार वि.वि. सूर्यकांत/अनंत मणी 8-7(5));
जीएआयएल वि.वि.इआयएल 2-0 (साकेत मायनेनी वि.वि.प्रफुल ठाकूर 8-1; प्रतीक एस वि.वि.साव्या साची 8-0);
महिला गट:
बीपीसीएल अ वि.वि.इआयएल 2-0 (वैष्णवी आडकर वि.वि.शोभा 8-0; रिया सचदेवा वि.वि.आरती 8-0);
एचपीसीएल वि.वि.बीपीसीएल ब 2-1(सानिया खुल्लर पराभुत वि.चारू यादव 4-8; डेनिका फर्नांडिस वि.वि.मैथिली 8-0; दुहेरी: डेनिका फर्नांडिस/सानिया खुल्लर वि.वि.चारू यादव/श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती 8-7(4));
जीएआयएल वि.वि.ओएनजीसी 2-1 (सोहिनी मोहंती वि.वि. आशु सिंग 8-0; लक्ष्मी दांडू पराभुत वि.अंकिता रैना 3-8; दुहेरी: सोहिनी मोहंती/लक्ष्मी दांडू वि.वि.अंकिता रैना/आशु सिंग 8-3);
प्रौढ गट:
बीपीसीएल अ वि.वि.इआयएल 2-0 (राज कुमार दुबे वि.वि.एस महेश 6-1; महेश शर्मा वि.वि.रमन सूद 6-0);
ओआयएल वि.वि.जीएआयएल 2-0(अली वि.वि. दुर्गेश 6-1; एसडी भराली वि.वि.प्रशांत 6-2);
बीपीसीएल ब वि.वि.आयओसीएल 2-0 (मनीष सारडा वि.वि.पंकज जी 6-3; मनीष कुमार वि.वि.त्रिभुवन कुमार 6-4);
एचपीसीएल वि.वि.एनआरएल 2-0(अनुप वि.वि. बाबुल ज्योतिदास 6-3; मुरली भूपती वि.वि.सुमन दुआरा 6-5(4);
एकेरी: पुरुष गट: पहिली फेरी:
बिस्वजित भट्टाचार्य(ओआयएल) वि.वि.नारायण नीलश(एमएनजीएल) 6-1;
भारत राजगर (बीपीसीएल)वि.वि.दीपक पांडे (ईआयएल) 6-3;
अपूर्व जैसवाल (जीएआयएल)वि.वि.सनी राजपाल (एचपीसीएल) 6-2;
दिविज शरण(आयओसीएल) वि.वि.करण पांचाल (एचपीसीएल) 6-0;
प्रतीक शेरॉन (जीएआयएल) वि.वि.रक्तिम भुयान (ओआयएल) 6-0;
रॉबिन ज्यूड (जीएआयएल) वि.वि.राजू कोंवर (ओआयएल) 6-2;
महिला गट: पहिली फेरी:
प्रार्थना ठोंबरे(आयओसीएल) वि.वि.एमएस मैथिली(बीपीसीएल ब) 6-1;
आशु सिंग (ओएनजीसी) वि.वि.शोभा (ईआयएल) 6-0;
सोहिनी मोहंती (जीएआयएल)(4) वि.वि. ईशा तुलसीयन(बीपीसीएल अ) 6-0.

More Stories
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत सुमैर पवानी व क्रिश आनंद, आकाश ललवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता यांचा उपांत्य फेरीत प्रवेश