दसऱ्यानिमत्त झाडाच्या फांड्या तोडू नये

पुणे, 0३ आॅक्टोबर २०२२ ः दसऱ्याच्या निमित्ताने कांचन वृक्षाच्या फांद्या ‘सोने’ म्हणून तोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृतपणे कांचन वृक्षाच्या फांद्या तोडू नये. असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने वृक्षतोड करणाऱ्यांवर पाळत ठेवलेली आहे. तसेच नागरिकांनाही कोणी फांद्या तोडत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी किंवा उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागाकडे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर आहेत, अशी माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.