पुणे दि. १८/०५/२०२२: जिल्ह्यातील सर्व अनाधिकृत शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून जिल्ह्यातील दोन शाळांचे वर्ग अनधिकृत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे ए.एम.एस. इंग्लिश मिडिअम स्कूल, चाकण ता. खेड या शाळेतील इयत्ता नववी ते दहावी वर्गामध्ये आणि लेडी ताहेरुनहिस्सा इनामदार हायस्कूल चेतना हौसींग सोसायटी वडगाव शेरी या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले आहे.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार