दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या आगामी ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात डॉ अमोल कोल्हे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार

पुणे, दि.१८ एप्रिल २०२२ : ‘राजा शिवछत्रपती’ , ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. महत्वाचे म्हणजे ‘रणभूमी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि दिग्दर्शक जयंत गिलाटर हे या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.

 

बॉलिवुड चित्रपट ‘चॉक अँड डस्टर’ , ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा गुजराती रिमेक, ‘गुजरात११’ तसेच सुपरहिट चित्रपट ‘हल्की फुलकी’ इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे.

 

जयंत गिलाटर यांच्या मते, ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.

 

‘विठ्ठल विठ्ठला’ ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत , चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.