डॉ. दामोदर खडसे यांची अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा विभागाच्या हिंदी सल्लागार समिती सदस्यपदी नेमणूक

पुणे, ३ जून २०२१: भारत सरकारतर्फे अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा विभागाच्या हिंदी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीत डॉ.दामोदर खडसे यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विभागाच्या प्रकल्पाबाबत हिंदीत माहिती आणि सल्ला देण्याचे काम ही समिती करणार आहे.

या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री या समितीचे उपाध्यक्ष असतील. तसेच सहा खासदार या समितीचे सदस्य आहेत. समितीत डॉ.खडसे यांच्या व्यतिरिक्त आणखी आठ जणाची तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहील.

डॉ.खडसे यांनी हिंदी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांच्या चार कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, नऊ कवितासंग्रह आणि 20पेक्षा अधिक पुस्तकांचे मराठीतून हिंदीत अनुवाद प्रकाशित झाले आहे. त्यांनी लिहलेल्या ‘बारोमास’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘बादल राग’ या कादंबरीस गोयंका साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.