पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

पुणे, 18 नोव्हेंबर 2022 – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ४० हजार रूपये विंâमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना ३१ ऑक्टोबरला वडगाव शेरी ते महानगरपालिका बसस्थानक प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी ६८ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला ३१ ऑक्टोबरला वडगाव शेरी ते महानगरपालिका बसस्थानक असा प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून खाली उतरल्यानंतर महिलेला हातातील सोन्याची बांगडी चोरल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन तरटे तपास करीत आहेत.