पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई

पिंपरी, 29/01/2022: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय अतिक्रमण पथकाने नेहरूनगर ते पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान अतिक्रमण कारवाई केली.

रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या १५ टपऱ्या , ४ रसवंती गृह , ३२ फुटपाथवरील अतिक्रमणे काढून टाकण्यात आले.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नेतृत्वात बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट,शेवलकर योगेश निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे, राजश्री सातळीकर, प्रियंका शिंदे,अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर , सुपरवायझर पंकज वाघे, तृप्ती महांडुळे , क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.